पावसाच्या हलक्या सरींनी येवला तालुका हिरवागार, हरणांचा कळप हिरवळीवर बागडतानाचा व्हिडीओ ईटीव्ही भारत'कडे - हरणांचा मनसोक्त बागडतानाचा व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video

येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये रिमझीम पावसामुळे परिसरातील डोंगर दऱ्यात चांगलीच हिरवळ दाटली आहे. या परिसरातील हरणांचे कळप या हिरवळीचा चांगलाच आनंद लुटताना दिसत आहेत. येवला तालूक्यात रिमझीम पाऊस सुरू आहे. या संततधार पावसाने परिसरातील वातावरण चांगलेच बहरले आहे. डोंगर दऱ्यात हिरवळ फुलली आहे. रानमाथ्यावरील काही डबके पाण्याने भरले आहेत. त्यामुळे येथील इतर प्राण्यांसह हरणांचा कळप चांगलाच बागडताना दिसत आहे.