राज्यातील नाट्यगृह पुन्हा सुरु होणे हा नव्या पर्वाचा आरंभ - डॉ. नीलम गोऱ्हे - बालगंधर्व रंगमंदीर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याला अनुसरून सर्व नाट्यगृह उद्यापासून (शुक्रवारी) सुरु होत आहेत. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर (आज) बालगंधर्व रंगमंदीर येथे विधान परिषदेच्या सभापती डाॅ. नीलम गोऱ्हे व अभिनेत्री लीला गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजन करत नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजवण्यात आली. यावेळी बोलताना निलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारने नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरु करण्याचा जो निर्णय घेतला त्याचे स्वागत केले आहे.