woman giving birth on the street : धक्कादायक; कोपरगाव तालुक्यात महिलेची प्रसुती झाली रस्त्यावर; आठवड्याभरात दुसरी घटना - woman giving birth on the street
🎬 Watch Now: Feature Video
कोपरगाव (अहमदनगर) - रात्रीच्या सुमारास महिलेची प्रसुती करायची असेल तर शासकीय रुग्णालयांच्या भरवशावर राहु नका, असे म्हणण्यासारखा प्रसंग समोर आला आहे. गेल्या दोन रात्रीत रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करुन न घेतल्याने कुडकुडत्या थंडीत रस्त्यावरच दोन महिलांची प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना घडली. ( woman giving birth on the street ) गुरुवारी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयात ( devlali pravara civil hospital ) एका महिलेस डिलेव्हरीसाठी दोन दिवस बाकी असल्याचे सांगत दाखल करुन घेतले गेले नाही. यामुळे महिलेची रुग्णालयापासुन काही अंतरावरच रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना घडली होती. त्यातच शुक्रवारीही रात्रीच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथेही रात्री एक महिला प्रसुती कळा होत असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तिथेही रात्री महिला परिचारीका आणि डॉक्टर नसल्याने त्या महिलेलाही दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे तिचीही रस्त्यात प्रसुती झाली आहे. या घटनेने आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. पुढारलेल्या आणि मात्तबरांचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात लागोपाठ दोन महिलांना वेळेवर दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे मोठमोठ्या ईमारतींसाठी लाखोंचा खर्च फक्त दिखाव्यासाठीच केला जातोय का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.