स्वप्नीलच्या कुटुंबियांविषयी सहानुभूती, एमपीएससीचा प्रश्न निकाली काढू-अजित पवार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत सोमवारी चांगलाच गाजला. यावरील चर्चेला उत्तर देताना एमपीएससीची सर्व पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी सदनात दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा सदनात उपस्थित केला. सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल केला. सर्व मुद्दे बाजुला ठेवून एमपीएससीच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, जेणेकरून आणखी स्वप्नीलचे बळी जाणार नाही असे फडणवीस म्हणाले.
Last Updated : Jul 5, 2021, 2:06 PM IST