VIDEO : काय आहे देवदिवाळी? त्रिपुरारी पौर्णिमेला साजरी केली जाते देवदिवाळी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - हिंदू धर्मात कार्तिक महिना हा विष्णू महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं. पुरणानुसार भगवान शंकरांनी त्रिपुरा नावाच्या महाराक्षसाचा वध केला होता. म्हणून त्याला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं आणि तो वध झाल्यामुळे सर्व देवी देवतांनी आनंद उत्सव साजरा केला, म्हणून त्याला देवदिवाळी म्हटलं जातं. या दिवशी गंगा स्नान, दान, तुलसी अर्चना, विष्णू पूजन आदी कर्म केल्यास त्याला पुण्य प्राप्त होतं, असे महंत अनिकेत शास्त्री महाराज देशपांडे यांनी म्हटले आहे.