राज्यात विकेंड लॉकडाऊन, मुंबईतील रस्ते, रेल्वे स्थानके ओस, पोलिसांची गस्त - mumbai latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई -राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनची मुंबईत कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. कालपर्यंत भरभरून वाहणारे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे दादर, अंधेरी, वांद्रे या नेहमी गजबज असलेल्या परिसरांमधील रस्तेही ओस पडले आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हातावर मोजण्या इतक्या गाड्या रसत्यांवर धावत आहेत. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे. आत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईकर विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.