जायकवाडी धरणातून आपेगाव आणि हिरडपुरी निम्न बंधाऱ्यात सोडण्यात आले पाणी - Paithan Latest
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11670636-412-11670636-1620363094756.jpg)
औरंगाबाद - जायकवाडी धरणातून गुरुवारी दुपारी आपेगाव आणि हिरडपुरी निम्न बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतर पाटबंधारे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गोदावरी नदीकाठावरील १६ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने दादेगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, उंचेगाव, आपेगाव, आगरनांदूर, टाकळी अंबड, हिरडपुरी या गोदाकाठावरील गावातून धरणाचे पाण्याची मागणी करण्यात आली होती. तहसीलदार चंद्रकांत शेळके, जायकवाडीधरण अभियंता संदीप राठोड, नामदेव खराद यांच्या उपस्थितीत जायकवाडी धरणाच्या दोन गेटमधुन आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आले. यामुळे गावाकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.