विधानपरिषद निवडणूक : धुळ्यात शांततेत पार पडले मतदान - धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी शहरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी धुळे-नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातून 437 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही जिल्ह्यात मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने मतदारांना मास्क बंधनकारक करण्यात आले होते. तसेच यावेळी येणाऱ्या मतदारांची तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडण्यात येत होते.