केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission Of India ) राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख ( Goa Assembly Election Dates ) जाहीर केली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात ( Goa Election Voting ) निवडणूक होणार आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार ( Goa Assembly Election Nomination Date ) आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार ( Goa Assembly Election Counting ) आहे.पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission Of India ) राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख ( Goa Assembly Election Dates ) जाहीर केली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात निवडणूक होणार ( Goa Election Voting ) आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार ( Goa Assembly Election Nomination Date ) आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार ( Goa Assembly Election Counting ) आहे. गोव्यात 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी विधानसभेसाठी मतदान तर, मतमोजणी..आम्ही निवडणुकीसाठी तयार दरम्यान, विधानसभा निवडणूक घोषित झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडणूकसाठी आपण तयार असल्याचे सांगत पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मतदारसंघ आणि मतदारसंख्या सर्वात जास्त मतदार वास्को मतदारसंघात 35 हजार 139सर्वांत कमी मतदार मुरगाव मतदारसंघात 19 हजार 958मतदारसंघवार मतदारांची सर्व साधारण संख्या 28 हजार 912 आहे.मतदारांपैकी उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये पाच लाख 39 हजार 420, दक्षिण गोवा जिल्ह्यामध्ये सहा लाख 17 हजार 44 मतदार आहेत. मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे आणि गाळणे हा बदल 1.24 टक्के झालेला आहे. मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्याही एकूण मतदारांपैकी 1.67 टक्के आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी 2295 जणांना मिळणार आहे. ते 18 ते 20 वयोगटातील आहेत.राजकीय परिस्थितीभाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप हे पक्ष शक्यतो सर्व मतदारसंघातून उमेदवार उभे करणार आहेत. तर गोवा फॉरवर्ड, मगोप (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) काही मोजक्या मतदारसंघातून उमेदवार उभे करतील. रोव्हॉल्युशनरी गोवन पक्षही मागे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाची फारशी हालचाल दिसत नाही.