Nagar Panchayat Election 2021 : गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू - Nagar Panchayat Election 2021

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 21, 2021, 10:21 AM IST

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात जिल्हापरिषद, पंचयातसमिती व नगर पंचायतचे आज (दि. 21 डिसेंबर)रोजी मतदान होत आहे. (Nagar Panchayat Election 2021) मोठ्या प्रमाणात मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गोंदिया जिल्ह्यात आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी, ८ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी आणि ३ नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी मतदान होणार असून ८ लक्ष ३८ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजवणार आहेत. (Nagar Panchayat Election Gondia 2021 या साठी १३७५ मतदान केंद्रावर मतदान होणार असून यासाठी ६०६८ कर्मचारी आधीकारी असून यात १४५६ महिला मतदारांचा समावेश आहे. तर, ४००८ पोलीस कर्मचारी १०८० होमगार्ड १९३ पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ उमदेवार, तर पंचायात समितीच्या ८६ जागाणसाठी ३८८ उमदेवार रिंगणात आहेत. तसेच, नगर पंचयतीच्या ४५ जागांसाठी २९३ उमदेवार रिगणात उभे असून ८ लाख ३८ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजवणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.