वादग्रस्त कृषी कायदे परत घेतल्याने मोदींची प्रतिमा आणखी उंचावली - विजय जावंधीया - शेतकरी आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13685894-717-13685894-1637390475050.jpg)
सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे (Farm Law)अखेर केंद्र सरकारने रद्द केले आहेत. सुमारे वर्षभराच्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. कृषी कायद्यांमुळे नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकांमध्ये मोदी सरकारला सपाटून मार खावा लागला होता. ज्यातून त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचा निष्कर्ष काढला जात होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे परत घेतले असल्याचं मत राजकीय वर्तुळातून उमटत आहे. पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा पराभव मिळेल या भीती पोटी सुद्धा तीनही कृषी कायदे परत घेण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. यासंदर्भात कृषि नेते आणि तज्ज्ञ विजय जावंधीया (Vijay jawandhia) यांनी देखील या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा छोटी होण्यापेक्षा आणखी मोठी झाल्याचं देखील ते म्हणाले आहेत. तीनही कृषी कायदे परत घेताना त्यांनी एमएसपी संदर्भात काही सूचना करायला हवी होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे