VIDEO : ठाण्यात माघी गणेश उत्सवानिमित्त वीटभट्टी कामगारांच्या देखाव्याचे सादरीकरण - वीटभट्टी कामगाराच्या देखावा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14396924-thumbnail-3x2-thane-news.jpg)
ठाणे - माघी गणेश उत्सवाची ( Maghi Ganesh Utsav in Thane ) परंपरा अलीकडच्या काळात वाढत असून जिल्ह्यातील शेकडो कुटुंब पाच दिवसाचा माघी गणेश उत्सव साजरा करून भक्तिभावाने गणरायाची पूजाअर्चा करीत असतात. त्यामध्ये भिवंडीतील पाये गावात राहणारे रायकर कुटुंबिय ही गणेशाची पूजा करतात. २८ वर्षांपूर्वी मुलगा जन्माला आला. तेव्हापासून रायकर कुटुंब माघी गणपतीची स्थापना करीत आहेत. यंदाच्या गणरायाचा देखावाही तितकाच बोलका असल्याचे त्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. लॉकडाऊनमध्ये आदीच ठप्प झालेला वीट विक्रीचा व्यवसाय त्यांनतर अवकाळी पावसाने वीटभट्टीसह कच्च्या विटांचे झालेले नुकसान पाहता त्यांनी पुन्हा गणरायला साकडे घातल्याचे सांगितले. यंदाच्या गणरायची वीटभट्टी लगत असलेल्या मजुरांच्या झोपडी सारखा हूबेहून देखावा करून त्यामध्ये स्थापना केली. शिवाय झोपडी शेजारीच वीटभट्टीवरील मजुरांचे काम करतानाचे चलचित्र दाखवून त्यांनी देखावा साकारला. आता हा गणरायाचा देखावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामीण भागातील भाविकांनी देखावा पाहण्यासाठी व गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रायकर त्यांच्या घरी एकच गर्दी केली आहे.