Union Budget 2022 : सरकारचे नियंत्रण यावे यासाठी क्रिप्टो चलनाबाबत पाऊल उचलले - अर्थतज्ज्ञ - Economist Umesh Dashrathi
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - येणारा काळ हा डिजिटलचा असणार आहे. त्यामुळे आज ( दि. 1 फेब्रुवारी ) झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman on budget 2022 ) यांनी डिजिटल चलन ( Digital Currency ) किंवा क्रिप्टो चलनाचा ( Cryptocurrency ) जगभरात मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. या क्रिप्टो चलनावर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नव्हते. मात्र, आता क्रिप्टो चलनावर भारत सरकारचे काही प्रमाणात नियंत्रण हवे या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी क्रिप्टो चलनाबाबत पाऊल उचलले आहे. आजच्या अर्थसंकल्पानुसार ( Union Budget 2022 ) क्रिप्टो चलनावर आता 30 टक्के कर लावण्यात येणार आहे. तसेच डिजिटल असेटही आयकरच्या ( Income tax ) कक्षेत आणले आहेत. तसेच आरबीआयच्या ( Reserve Bank of India ) माध्यमातून भारत सरकारचे डिजिटल चलन ( Digital currency ) सुरू केले जाणार असून ही स्वागतार्ह गोष्ट आहे. येणारा काळ हा डिजिटल असणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पातून सादर केलेले हे धोरण डिजिटल धोरणाशी सुसंगत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ उमेश दाशरथी यांनी व्यक्त केल आहे. आपला देश आता विकसित राष्ट्र होण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे जगातील आधुनिक तंत्रज्ञान व इतर आधुनिक गोष्टी आपल्या देशात येण्याची गरज निर्माण होत आहे. 5 जी तंत्रज्ञानाचा ( Union Budget On 5 G Network ) वापर करून जगातील मोजक्या देशांच्या पंगतीत जाऊन बसण्याची तयारी आपल्या देशाची असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसत आहे, असेही दाशरथी म्हणाले.