VIDEO : कांदा आणण्यावरून वाद; हॉटेलबाहेर दोन गटात तुंबळ हाणामारी - clash in Aurangabad
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - कॅनॉट परिसरात व्हीआयपी मराठा हॉटेलमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तीस ते चाळीस जणांनी एक दुसऱ्यांचा डोक्यात लाठ्या काठ्या टाकल्या. यात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. व्हीआयपी मराठा हॉटेलमध्ये ब्रिजवाडी परिसरातील काही तरुण जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये कांदा अणण्यावरून किरकोळ वाद झाला. यातूनच काही तरुणांनी हाणामारीस सुरुवात केली.