VIDEO : पर्यटनस्थळावरील बंदी उठवल्याने लोणावळ्यातील व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण - पर्यटनस्थळावरील बंदी उठल्याने चिक्की व्यापारी आनंदीत
🎬 Watch Now: Feature Video
लोणावळा - पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आजपासून (सोमवारी) पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत. ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोना झपाट्याने पसरला. संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारकडून 10 जानेवारीला पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. परंतु रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याचे पाहून पर्यटन खुले करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यातील चिक्की व्यापाऱ्यांकडून या निर्णयाचा स्वागत करण्यात आला आहे.