'थँक यू डॉ.आंबेडकर' औरंगाबादेत डिजिटल डिस्प्ले लावून महामानवास अभिवादन
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद : शहरातील काही तरुणांनी एकत्र येत भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 'थँक यू डॉ. आंबेडकर' असा डिजिटल डिस्प्ले लावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी या तरुणांनी हा डिस्प्ले लावला आहे. अमोल साळवे आणि ज्ञानेश्वर भालेराव या दोन तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला. बाबासाहेबांमुळेच आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. म्हणूनच 'थँक यू डॉ.आंबेडकर' या संकल्पनेतून आम्ही हा डिजिटल डिस्प्ले लावून अभिवादन केल्याचे ज्ञानेश्वर भालेराव यांनी सांगितले. औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यालाच प्रतिसाद देत ढोल ताशा, डीजे न लावता साध्या पद्धतीने जयंती साजरा करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे.