शिक्षक मतदारसंघ निवडणूक : यवतमाळ येथे पीपीई किट घालून शिक्षकांनी बजावला मतदानाचा हक्क - yavatmal latest news
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - अमरावती शिक्षक मतदार संघासाठी आज पॉझिटिव्ह असलेल्या शिक्षक मतदारांनी पीपीई किट घालून मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रावरती आज शिक्षक मतदार संघासाठी मतदान करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विलगीकरण कक्ष उघडण्यात आले होते. जे शिक्षक तपासणीमध्ये पॉझिटिव आढळले, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची तपासणी करूनच मतदानासाठी मतदान कक्षात पाठवण्यात आले.