मनसुख हिरेन प्रकरण तपास : काय म्हणाले सुनिल प्रभू? - mansukh hiren death case
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देणार नसून हा तपास करण्यासाठी राज्य पोलीस दल सक्षम असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. मनसुख हिरेन हा या प्रकरणात महत्वाचा पुरावा असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपल्या भाषणात सांगितले आणि केवळ दीड तासानंतर त्या मनसुख हिरेनचा मृतदेह कळव्याच्या खाडीत सापडला. याप्रकरणी शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी सांगितले की, राज्य स्तरावरची यंत्रणा तपास प्रक्रियेत अयशस्वी झाली तर राष्ट्रीय तपास यंत्रणेला हा तपास हाती घेण्याचा अधिकार आहे.