नाशिक जिल्ह्यात कोविड-19 चा एक डोस घेऊन विद्यार्थी महाविद्यालयात दाखल - महाराष्ट्र अनलॉक
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक जिल्ह्यात कोविड 19 चा एक डोस घेऊन विद्यार्थी महाविद्यालयात दाखल झाल्याचे चित्र बघायला मिळाले. सरकारने कोविड-19 चे दोन डोसनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्यावा, असं म्हटले असताना या नियमाला महाविद्यालयाने हरताळ फासल्याचे दिसून आले. शाळा पाठोपाठ आज जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालय सुरू झाली असून आज पहिल्या दिवशी वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेनं विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालयाच्या आवारात विशेष व्यवस्था केल्याच प्राचार्यांनी सांगितले. आज पाहिल्या दिवशी शहरातील 48 महाविद्यालयात जवळपास 18 हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचा अंदाज आहे. महाविद्यालयातून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतला आढावा.