मुंबईत विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, रस्त्यावर शुकशुकाट - मुंबई कोरोना न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11362570-442-11362570-1618125685912.jpg)
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोणा संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लॉकडाऊन घोषित केला जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर पाहायला मिळालेला आहे. या विकेंड लॉकडाऊनमुळे एरवी खचाखच भरलेले रस्त ओस पडलेले दिसून येत आहेत. ठाणे आणि नवी मुंबईहून जर दक्षिण मुंबईला जायचे असेल तर मुंबईतील सर्वात सोपा मार्ग म्हणून पूर्व द्रुतगती मार्गकडे पाहिले जाते. ईस्टर्न फ्री वे म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्गावर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच गाड्या धावताना दिसत आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.