आम्हाला पगारवाढ नको, राज्य शासनात विलीगीकरणच पाहिजे; एसटी कर्मचारी संपावर ठाम - ministeranil parab st workers

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 24, 2021, 8:40 PM IST

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Strike) संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा त्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. तर भाजपसह इतर संघटनांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला जात आहे. संपाबाबत तोडगा निघावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांच्यासोबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्या संदर्भातील घोषणा देखील मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची जी घोषणा केली आहे ती आम्हाला मान्य नाही, आमचा संप हा पगारवाढीसाठी नव्हे तर राज्य शासनात विलीगीकरण करण्यासाठी आहे, अशी भूमिका यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.