ST Workers Apologize for Strike :एसटी कर्मचाऱ्यांनी नागरिकांची मागितली माफी, म्हणाले... - strike still continue
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संपातून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी माघार घेतली आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम ( ST Workers Strike ) आहेत. संप मागे घेतल्याच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेता कोण कुठे जातो याच्या विचार न करता संघटना विरहित असलेला दुखवटा चालू राहणार ( ST Workers Strike Still Continue ) आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. गेली 55 दिवस आम्ही 28 संघटना बाजूला केले आहे. आमच्या संपामुळे राज्यभरातील एसटी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ( ST Workers Apologize for Strike ), अशा भावना एसटी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'समोर व्यक्त केली आहे.