अनलॉकः धुळ्यात आजपासून लालपरीची सेवा सुरू - धुळे बस न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12049155-343-12049155-1623068544837.jpg)
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली एसटी बस सेवा आजपासून (7 जून) सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आहे. यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. आजपासून जिल्ह्याअंतर्गत बस धावणार आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. बस सेवा सुरू होताच अनेकांचा बसस्थानकातील रोजगार पुन्हा सुरू होणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून बस बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे बसस्थानकातील छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. आता पुन्हा व्यवसाय सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यवसायिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद बघायला मिळत आहे.