महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प - लेखक दीपक पवारांची 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत - दीपक पवार बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10401639-thumbnail-3x2-dp.jpg)
मुंबई -‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून महाराष्ट्राने सीमालढ्यात दिलेले बलिदान या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक दीपक पवार यांनी मांडले आहेत. पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपास्थित होते. सीमा भागाचा प्रश्न काळाच्या ओघाग मागे पडत चालला आहे. मात्र, पुस्तक प्रकाशनाच्या मध्यातून सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने आता पुन्हा हा प्रश्न नव्या जोमाने समोर आणला जाईल, अशी आशा लेखकांनी व्यक्त केली. तसेच खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्र आल्याने आता लढ्याला बळ येईल, असे मत दीपक पवार यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लेखक दीपक पवार यांच्याशी खास बातचीत केली आहे 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने