VIDEO : गारुडीपासून सापाची सुटका केल्यानंतर सर्पमित्राला दंश; सर्पमित्र सुरक्षित - sarpamitra secured nashik
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - सर्प बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही नानेगाव येथे एक गारुडी सर्प बाळगत गावोगावी पैसे जमा करीत असल्याचे समोर आले होते. याबाबत नागरिकांकडून सर्पमित्र विक्रम कडाळे यांना समजल्यावर त्यांनी नानेगाव येथे जाऊन सर्पची सुटका केली. यानंतर तो सर्प जंगलात सोडून देत असताना त्यांना या सर्पाने दंश केला. (Snake bites Sarpamitra in nanegaon nashik) मात्र, या सर्पचे विषारी दात काढलेले असल्याने सर्पमित्र विक्रम कडाळे बचावले. ज्या ठिकाणी चावा घेतला त्याठिकाणी थोडीशी सूज आली होती. मात्र, इतर कुठलाही त्रास झाला नाही, असे सर्पमित्राने सांगितले. तरी पण एक खबरदारी म्हणून दवाखान्यात स्वतः जाऊन दाखल झालो. डॉक्टरांनी दोन Antivenoum चे दोन डोस दिले. यानंतर दुसऱ्या दिवशी सोडून दिले. दंश झाल्यास प्रथम दवाखान्यात जाऊन उपचार करावे, असे आवाहन सर्पमित्र विक्रम कडाळे (sarpamitra vikram kadale) यांनी सांगितले आहे.
TAGGED:
sarpamitra secured nashik