पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा उत्सव... - दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव पुणे बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8490346-thumbnail-3x2-pune.jpg)
पुणे : येथील गणेशोत्सव हा प्रसिद्ध गणेशोत्सव असून संपूर्ण देशात याची ख्याती आहे. पुण्यात मानाचे पाच गणपती असतानाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा मान मात्र वेगळाच आहे. अतिशय थाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्यनियमाने पूजा चालू असते. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. यंदा मात्र कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे.