मेंढपाळांचे येवला वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - जय मल्हा सेनेचे सरनेसानापती लहु शेवाळे
🎬 Watch Now: Feature Video
येवला ( नाशिक ) - येवला तालुक्यात ममदापुर शिवारातील जंगलात मेंढपाळाचे वाडे अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. मेंढपाळांचे वाडे बसतात तेथे मेंढ्यांचे लेंडी खत मोठ्या प्रमाणात जमा होते. दरवर्षी दीपावलीनंतर हे खत मेंढपाळ आपल्या शेतात घेऊन जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून येवला वनविभागाच्यावतीने हे खत उचलण्यास मेंढपाळांना मनाई करण्यात येत ( Shepherds issue in Yevala Taluka ) आहे. हे खत मेंढपाळांनाच मिळावे या ( Jay Malhar Sena demands for Shepherds ) मागणी करता जय मल्हार सेनेच्यावतीने मेंढपाळांना सोबत येवला वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात ( Shepherds agitation against forest department ) आले. यावेळी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहु शेवाळे ( Jay Malhar Sena president Lahu Shewale ) , जिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, तालुकाप्रमुख गणेश गायकवाड, संपर्कप्रमुख शिवाजी काटकर,रंगनाथ खरात यांच्यासह परिसरातील मेंढपाळ यावेळी उपस्थित होते.