माजी कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाडव्यानिमित्त औक्षण - बारामती
🎬 Watch Now: Feature Video
बारामती (पुणे) - दिवाळीतील पाडवा हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. या पाडवा सणानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांचे औक्षण करण्यात आले. पवार कुटुंबीय विविध कामानिमित्त विविध देश-विदेशात असतात. त्यामुळे कुटुंबीयांची गाठभेट होत नसल्याने वर्षातून काही दिवस एकत्रित यावे, अशी भावना शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांची होती. तेव्हापासून आजपर्यंत पवार कुटुंबीयांची ही परंपरा सुरू आहेत. शुक्रवारी (दि. 5) पाडव्यानिमित्त शरद पवार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सदानंद सुळे यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना त्यांची पत्नी कुंती पवार यांनी पाडव्यानिमित्त औक्षण केले.