Param Bir Singh : परमबीर सिंह यांची तब्बल सात तास चौकशी - कांदिवली गुन्हे शाखा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh ) यांची सात तास चौकशी करण्यात आली. सकाळी 11 वाजल्यापासून कांदिवली गुन्हे शाखेच्या युनिट-11 कार्यालयात त्यांची चौकशी सुरू होती. पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत होते. 231 दिवस बेपत्ता असलेले परमबीर सिंह हे पोलिसांसमोर सकाळी हजर झाले होते. गोरेगाव खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. तब्बल सात तास त्यांची चौकशी करण्यात आली. उद्या पुन्हा त्यांची चौकशी होऊ शकते.