Clerk Fraud in School : विद्यार्थ्यांच्या फीचे 14 लाख लाटणाऱ्या मुंबईतील लिपीक महिलेला अटक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- विद्यार्थ्याच्या फीचे पैसे 14 लाख रुपये लाटणाऱ्या महिला लिपीकाला कस्तुरबा पोलिसांनी ( woman clerk arrest in Boriwali ) अटक केली आहे. स्वाती कदम (४०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने तिला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शाळेच्या विश्वस्तांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आल होता. बोरिवली पूर्वच्या सिद्धार्थ नगरच्या सेंट जाॅर्ज हायस्कूल ( St George s High School boriwali fraud case ) येथील खासगी शाळेत स्वाती कदम ही लिपीक म्हणून कामाला होती. कोविड-19 मुळे शाळा बंद असल्या तरी आॅनलाईन वर्ग सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षाची फी घेतली जात होती. हे पैसे कदम बनावट चेकद्वारे चोरत ( clerk arrested in Rs 14 lakh cheating case ) होती. दोन वर्षात कदम हिने तब्बल 14 लाखांवर डल्ला मारला. शाळेच्या लेखापरीक्षणा दरम्यान हा सर्व प्रकार समोर आला. शाळा प्रशासनाच्या विश्वस्तांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात महिला लिपिका विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्वाती कदम हिला अटक केली. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.