संजय राठोड यांनी केली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात डवरणी
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - आर्णी ताक्यातील जांब येथील शेतकरी हितेश गणेश आडे यांनी 14 ऑगस्ट 2020मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. गुरूवारी कृषी दिनानिमित्त माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या शेतात सपत्नीक श्रमदान केले. यावेळी आमदार संजय राठोड यांनी कपाशीत डवरणी तर पत्नी शीतल राठोड यांनी खत दिले. त्यांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण दिवस घालविला. यावेळी शासनाकडून कुठल्या योजनांचा लाभ मिळाला किंवा शासनाकडून काय अपेक्षित आहे या सर्व बाबींवरही चर्चा केली. तसेच आत्महत्याग्रस्त युवा शेतकऱ्याचे वडील गणेश आडे व आई रुकमा आडे यांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. शेतीतील कुठलेही कामे मी व माझा मुलगा हे दोघेच शेतात करत होतो. मात्र, आज आमदार संजय राठोड यांनी शेतात अकस्मात भेट देऊन शेतात डवरणी केली. त्यामुळे आज माझा मुलगाच सोबत असल्याची भावना वडील गणेश आडे यांनी व्यक्त केली.