नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकांचा धुमधडाका सुरू झाला आहे. आता तर नागपूर येथे भाजपा उमेदवारांच्या मदतीसाठी स्टार प्रचारकांसह मध्यप्रदेशातील कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. यामुळं येथील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
ठिकठिकाणी सभा रॅलींवर भर : गल्लीबोळापासून घरा घरात आपलं नाव आणि चिन्ह पोहचवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार प्रयत्न करत आहेत. यासाठी चौका चौकात, खुल्या जागेवर सभा, बैठका आणि रॅलींवर भर दिला जात आहे. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवाय कार्यकर्ते आणि लोकांमध्ये जोश भरावा यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत.
कैलाश विजयवर्गीय प्रचारासाठी नागपुरात : आता तर भाजपा उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाची अख्खी टीम नागपूरच्या मैदानात उतरली आहे. भाजपाचे नेते मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय भाजपाचे नागपूर जिल्हा निवडणूक प्रभारी आहेत. त्यांनी नागपूर शहरासह ग्रामीण निवडणुकीचा आढावा घेऊन नियोजन केलय. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपाचा माहोल निर्माण व्हावा यासाठी मध्यप्रदेशातील भाजपाचे कार्यकर्ते आणि कलाकार यांनाच नागपूरच्या मैदानात उतरवलं आहे.
नागपुरात भाजपाचा माहोल : मध्यप्रदेशातील भाजपाचे कार्यकर्ते आणि नावाजलेले कलाकार नागपूर येथे दाखल झाले आहेत. त्यांचा प्रचार जोशात सुरू आहे. हे सर्व कार्यकर्ते आणि कलाकार ठिकठिकाणी सभा, बैठकांमधून ऑर्केस्ट्रा आणि कलापथकाद्वारे भाजपाचा प्रचार करतात. भाजपा उमेदवाराची ज्या भागात रॅली असेल त्या भागात अगोदरच पोहचून, ऑर्केस्ट्रा आणि अन्य कलागुणांच्या माध्यमातून भाजपाचा महोल तयार करतात. विशेषतः मध्यप्रदेशातील सदर पथकाचा उपमुख्यमंत्री तथा भाजपा उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील वस्त्यांमध्ये जास्त भर असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा -