VIDEO : चंद्रपुरात धावत्या बसने घेतला पेट, बस जळून खाक, बसमध्ये होते 25 प्रवासी - Running travel bus burn in Chandrapur
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - चंद्रपूर-मूल मार्गावर एका धावत्या बसने अचानक पेट ( bus burn in short circuit at Chandrapur ) घेतला. ही बस जळून खाक झाली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज मंगलवारी दुपारच्या सुमारास लोहारा जवळ घडली. कृष्णा ट्रॅव्हलची बस चंद्रपूरकडे दुपारी निघाली होती. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. ही बस लोहारा जवळ आली असता अचानक गाडीने पेट ( Running travel bus burn ) घेतला. शॉर्ट सर्किटमुळे या बसने पेट घेतला अशी माहिती मिळत आहे. चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढले. बघता बघता गाडीने पेट घेतला आणि काही वेळात ही बस जळली. अग्निशमन दलाच्या गाडीने ही आग विझविण्यात आली.