नागपूर पदवीधर निवडणुकीच्या निकालाचे परिणाम राज्याच्या राजकारणात दिसेल - मंत्री सुनील केदार - nagpur congress news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार पुढे आलेले आहेत. भाजपच्या गडाला खिंडार पडायचे असेल, तर एकसंघ राहून मेहनत घेतल्यास कोणतीही गोष्ट कठीण नाही, हा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांनी दिला. गेल्या वर्षभरात पेक्षा जास्त काळापासून काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी हे या मतदारसंघात मेहनत घेत होते. त्यामुळे आज पदवीधरांनी आमच्या गळयात विजयाची माळ घातलेली आहे, असेही सुनील केदार यांनी म्हटले आहे.