दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, टोपे यांनी घेतले महालक्ष्मी मातेचे दर्शन - Religious places open
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेली राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. राज्यातील मंदिर खुली होत असल्याने एक आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत घटस्थापनेच्या दिवशी आशीर्वाद घेतला आहे. त्यानंतर टोपे म्हणाले, की सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. पण दसरा आणि दिवाळीनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक भान ठेवून वर्तवणूक ठेवणे आवश्यक आहे. कळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
Last Updated : Oct 7, 2021, 5:23 PM IST