VIDEO : कोल्हापूरकर म्हणतात... परत लॉकडाऊन नगं रं बाबा...! - पुन्हा लॉकडाऊनाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13844416-thumbnail-3x2-kolh.jpg)
कोल्हापूर - कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा ( New Omicron Variant ) धोका ओळखून राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर ( New Guidelines of The State Government ) केली आहे. शिवाय ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन ( Again Lockdown ) बाबतच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर मात्र लॉकडाऊनच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. आता कुठे सर्वकाही रुळावर आले आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन नको. जर लॉकडाऊन झाला तर खायचे काय हा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. याबाबतच कोल्हापुरातील छोटे मोठे व्यावसायिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.