राजेश टोपे यांना बांधली बहिणीने राखी, येणाऱ्या सर्व सणांमध्ये कोरोना नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन - राखीपौर्णिमा
🎬 Watch Now: Feature Video
जालना - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज रक्षाबंधन सण अत्यंत साधेपणाने साजरा केला. टोपे यांचे त्यांच्या बहिणीने औक्षण करून त्यांना राखी बांधली. तसेच, त्यांचे आशीर्वाद घेतले. जालन्यातील पाथरवालामध्ये टोपे यांनी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. दरम्यान, राज्यात कोरोनाचे संकट आणखीही आहे. त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सणांमध्ये नागरिकांनी कोरोनचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.