VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरएमएल रूग्णालयात लस घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीशी साधला संवाद - नरेंद्र मोदी
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त केला आहे. भारताने गुरुवारी 100 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक आकडा पार केला. कोविडच्या विरोधात नऊ महिन्यातच ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्यावर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएमएल हॉस्पिटलमधील लसीकरणस्थळी भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनाची १०० कोटी लस दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात देण्यात आली. अरुण राय यांना यांना शंभर कोटीवी लस देण्यात आली. अरुण हा वाराणसीचा रहिवासी असून तो अपंग आहे.
Last Updated : Oct 21, 2021, 1:41 PM IST