एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचितचा पाठिंबा - प्रकाश आंबेडकर - एसटी महामंडळ
🎬 Watch Now: Feature Video
एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्या. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.