गडचिरोली ग्रामपंचायत निवडणूक : कडेकोट बंदोबस्तात पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरने रवाना
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली - जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. दोन टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात 15 जानेवारीला उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यात तर दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यात मतदान होणार आहे. 360 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आहे. जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरने रवाना झाल्या असून आजपासूनच मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धानोरा तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्र असलेल्या फुलबोडी केंद्रावरून ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी घेतलेला आढावा.