सातारा : रेवंडे गावाजवळ कोसळला अडचणींचा 'डोंगर'; प्रशासन अद्याप कुंभकर्णीय निद्रेत - सातारा परळी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - परळी खोऱ्यातील दुर्गम डोंगरावर असलेल्या रेवंडे गावाजवळ, डोंगरकडा कोसळून रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्त्याने जाताना खाच-खळग्यांमुळे गर्भवती महिलेचे अर्भक पोटातच दगावले. प्रशासन मदतीला धावेल या आशेवर ग्रामस्थ मागील चार दिवस वाट पहात आहेत. मात्र, ना विचारपूस करायला आले आणि ना कोणी रस्त्यात पडलेल्या भल्यामोठ्या शिळा हलवायला आले. कुंभकर्णीय झोपेत असलेले जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना आणखी किती बळी हवेत, असा सवाल रेवंडे ग्रामस्थ विचारत आहेत.