कोरोनाशी लढा देणाऱ्यांच्या सन्मानार्थ रत्नागिरीत घुमला 'टाळी' अन् 'थाळीनाद' - Lackdown
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता शहरात टाळी आणि थाळ्यांचा एकच नाद घुमू लागला. कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, हाॅस्पिटल कर्मचारी, पोलीस, महावितरण, प्रशासन आणि शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत थाळीनाद करण्यात आला. रत्नागिरीत ८८ वर्षीय वृद्धेनेही आपल्या कुटूंबासह थाळीनाद करत आपली कृतज्ञता व्यक्त केली. रत्नागिरी शहरात अशाच प्रकारे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात थाळीनाद करण्यात आला. रत्नागिरी शहरातील माळनाका येथी धवल काॅम्पलेक्समधील नागरिकांनीही घराच्या बाल्कनीत येऊन थाळीनाद केला..