महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आमचा संकल्प -सोमैया - Somaiya
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - उद्धव ठाकरे सरकारचे ३१ डिसेंबरपर्यंत बरेच घोटाळे उघड होतील. त्यामध्ये प्रत्येकाची चौकशीची कारवाई सुरू झालेली असेल. त्यानंतर कळेल हे सरकार किती भ्रष्ट आहे. अशी टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते कांदिवलीत भाजपकडून आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, सबंध महाराष्ट्रात भाजपकडून कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्या आला आहे. त्यामुळे सगळीकडे मी सध्या फिरणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणे हा आमचा संकल्प आहे असही सोमैया यावेळी म्हणाले आहेत.