ST Worker Strike : एसटीतील 'या' एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटनेची मान्यता रद्द; औद्योगिक न्यायालयाचा दणका - एसटी कामगार संघटना मान्यता
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - एकीकडे गेल्या 77 दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तसेच बेकायदेशीर संपावर गेलेल्या कामगारांवर महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयाने रद्द केली आहे. कर्मचाऱ्यांचे नुकसान करून केवळ संघटनेच्या फायद्याचे निर्णय घेणे, विविध कलमांचे उल्लंघन करण्याचा ठपका ठेवत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मान्यताप्राप्त संघटनेच्या विरोधात गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीसमुकेश तिगोटे हे लढा देत होते. अखरे त्यांना यश आले आहे. आमचे प्रतिनिधी नितीन बिनेकर यांनी याबाबद इंटकचे वकील सीमा चोपडा आणि संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.