Video : ठाकरेंबद्दल बेताल वक्तव्य, राष्ट्रवादीनेही जाळला राणेंचा पुतळा - राष्ट्रवादी काँग्रेस पुणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या थराला जाऊन आक्षेपार्ह विधान केले. यामुळे काल महाराष्ट्रभर वाातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी राणेंचा निषेध केला. मुंबईत तर भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. तर राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केले. यावेळी महविकास आघाडीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनामुळे शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडी झाली होती. पुण्यात मंडई येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. तर पुण्यातील भाजप पक्ष कार्यालसमोर फटाकेही फोडले.