तौक्ते चक्रीवादळ; मुंबईतील जनजीवन ठप्प; बेस्टसह लोकल, विमानसेवा रखडली - तौक्ते वादळ महाराष्ट्र
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौत्के' चक्रीवादळाचा परिमाण सकाळपासून मुंबईत दिसत आहे. मुंबईत जोराच्या वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने हवाई, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम पडला आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौत्के' चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले असून, ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र, आज सकाळीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुंबईच्या जीवनवाहिनीवर मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या डाउन मार्गांवर ओव्हरहेड वायर आणि एका लोकलवर झाडाच्या फ़ांद्या पडल्या आहे. परिमाणी डाउन मार्गावरील वाहतूक रखडली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवरून सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत सर्व विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. पावसाचा फटका मुंबईच्या बेस्ट आणि एसटीलाही फटका बसला आहे. शहराच्या सखल भागात पाऊसाचे पाणी साचल्यात असल्याने त्या भागातील अनेक बेस्टच्या बसेस वळविण्यात येत आहे.