VIDEO : औरंगाबादमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण - औरंगाबादमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13715773-996-13715773-1637674477516.jpg)
औरंगाबाद - सत्यविष्णू हॉस्पिटल दाभाडे मार्केट एन १२ येथे वीज चोरी पकडल्याचे राग मनात धरून तरुणाने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना मंगळवार (आज) दुपारच्या सुमारास घडली. ईश्वर शिवाजी मोकळे (वय २९ रा.पिसादेवी) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाई दरम्यान उपस्थित कर्मचारी हा कामनिमित्त सहकर्यांसोबत असताना यावेळी राहुल बुंडीले (रा. एन १२ सिदर्थ नगर) याने ईश्वर यांना शिवीगाळ केली. यावेळी सोबतचे कर्मचारी विनवणी करत असताना तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी कर्मचारी सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखले झाले.