एमपीएससी परीक्षा वेळेवर घ्या; विद्यार्थी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला - MPAC student meets opposition leader Devendra Fadnavis
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी परिक्षेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नियोजित तारखेपेक्षा पुढे ही परीक्षा ढकलण्यात आली आहे. त्यानंतर आठ दिवसात परीक्षा घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा येत्या २ दिवसात घ्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. परिक्षा पुढे ढकलल्यास राहण्यासाठी आणि खाण्यासाठी पैसे कुठून आणायचे? असा सवालही विद्यार्थ्यांनी केला आहे.