मनसुख हिरेन प्रकरणाचे धागेदोरे 'मातोश्री'वर, खा. नवनीत राणांचा गंभीर आरोप - नवणीत राणा उद्धव ठाकरे वाद
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी सापडण्याच्या प्रकरणातील धागेदोरे हे थेट 'मातोश्री'कडे वळताना दिसत आहेत, असे खळबळजनक वक्तव्य खासदार नवणीत राणा यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. अधिवेशनावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याविषयी मागणी करत होते. मात्र, त्याकडे या सरकारने दुर्लक्ष केले, याप्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझेला सरळ-सरळ पाठिशी घातले जात होते. आता चौकशीतून वेगळेच सत्य समोर येताना दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रकरणावरून खासदार राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
Last Updated : Mar 16, 2021, 4:12 PM IST