राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे घेतले दर्शन - Mohan Bhagwat visit Ambadevi temple
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अमरावतीमधील महानगर कार्यवाह श्याम निळकरी यांच्या घरी बुधवारी आले होते. निळकरी यांच्या घरी जेवण आणि आराम केल्यावर मोहन भागवत यांनी चार वाजता श्री अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी दोन्ही मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. मोहन भागवत हे देवीच्या दर्शनासाठी आले असताना मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.